राहुल गांधींनी ‘ती’ माहिती समोर आणत विचारला ‘हा’ सवाल

दिल्ली :

कॉंग्रेस नेते व खासदार राहुल गांधी हे सातत्याने करोनावरून आणि भारत चीन सीमावादाच्या प्रश्नावरून मोदी सरकारवर टीका करत आहेत. तसेच त्यांना प्रश्नही विचारत आहेत. आज त्यांनी एका तक्ता शेअर करत भारत करोना युद्धात चांगल्या स्थितीत आहे काय? असा सवालही विचारला आहे.

त्यांनी शेअर केलेल्या तक्त्यात स्पष्ट दिसते की, बाकीच्या देशांनी कशा पद्धतीने करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणला. तुलनेत भारत आणि अमेरिका यांना मात्र ते जमलेले नाही. हा करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याला कोण जबाबदार आहे, असाही सवाल त्यांनी यापूर्वी उपस्थित केला होता.

राहुल गांधींवर विरोधक मात्र छोटमोठ्या मुद्द्यांवरून टीका करत असतात. मात्र त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे उत्तर द्यायला कुणीही धजावत नाही.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*