भाजप- शिवसेना एकत्र येऊन नये म्हणून पवारांनी खेळली ‘ती’ राजकीय चाल

मुंबई :

‘सामना’चे संपादक व शिवसेना नेते संजय राऊत यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांची मुलाखत घेतली. यावेळी पवार यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले.  २०१४ च्या सत्ताकाळातही राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठींबा देऊ असे राष्ट्रवादीने सांगितले होते. यावर पवारांनी धक्कादायक खुलासा केला आहे. शिवसेना आणि भाजपा यांच्यातील अंतर वाढावं यासाठी ती राजकीय चाल पवार खेळले होते, असे स्वत: पवार यांनी कबूल केले.

याबाबत पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, शिवसेनेला सोबत घ्यायचं नाही स्थिर सरकार बनवायला आम्हाला साथ द्या असं भाजपाचे काही नेते आमच्या लोकांशी बोलत होते, आमच्यातल्या काही सहकाऱ्यांशी, माझ्याशीही एक-दोनदा बोलले, पंतप्रधानांनी यात हस्तक्षेप करावा आणि मी त्याला संमती द्यावी म्हणून माझ्या कानावर निरोप आला. त्यावेळेला तो निरोप आल्यानंतर देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांच्याकडे आपल्या पक्षाबद्दल आणि आपल्याबद्दल चुकीची माहिती जाऊ नये म्हणून मी स्वत: पार्लामेंटमध्ये त्यांच्या चेंबरमध्ये जाऊन त्यांना सांगितलं की, आम्ही तुमच्याबरोबर येणार नाही, जमलं तर आम्ही शिवसेनेसोबत सरकार बनवू किंवा विरोधी पक्षात बसू, पण आम्ही तुमच्यासोबत येऊ शकत नाही आणि हे मी सांगायला जाताना एक गृहस्थ पार्लमेंटमध्ये माझ्या शेजारी होते, त्यांचं नाव संजय राऊत. त्यांना सांगून गेलो की, मी पंतप्रधानांना सांगायला जातोय, मी परत आलो, त्यावेळी राऊत तिथेच होते, त्यांच्या कानावरही मी पंतप्रधानांबरोबरची चर्चा घातली.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*