मोदींच्या सत्तेला सुरूंग लावण्याचा प्लॅन ठरलाय, त्यासाठी मी पुढाकार घेणार; ‘या’ बड्या नेत्याचा गौप्यस्फोट!

मुंबई :

‘सामना’चे संपादक व शिवसेना नेते संजय राऊत यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांची मुलाखत घेतली. यावेळी पवार यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले तसेच अनेक राजकीय विषयांवर उहापोह केला. ‘करोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर नरेंद्र मोदींची सत्ता उलथवून लावण्यासाठी मी सगळ्यांशी बोलणार आहे’, असा गौप्यस्फोट पवार यांनी केला.

याविषयी पुढे बोलताना पवार म्हणाले की, देशांतल्या विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांमध्ये अशी एक भावना आहे की आपण एकत्र बसलं पाहिजे. आपण एकत्र बसून एक कार्यक्रम ठरवून देशवासियांसमोर एक पर्याय दिला पाहिजे. तो पर्याय देण्याची कुवत आजच्या विरोधी पक्षाच्या नेत्यामध्ये आणि त्यांच्या ऐक्यामध्ये निश्चितपणे आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सगळे पक्ष कोरोनाकडे डायव्हर्ट झाल्याने ते काम आज थांबलं आहे. कोरोनाचे संकट येण्यापूर्वी देशांमधील विरोधी पक्षांचे लोक दोनदा एकत्र बसले. चर्चा केल्या. काही गोष्टींची धोरणे ठरवण्याच्या दृष्टीने विचार केला. आणि हे सगळं चित्र बदललं या रोगामुळे… पण माझी खात्री आहे की एकदा का संसद सुरू झाली की सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र करणं याबद्दलची भूमिका घ्यावी लागेल, असेही पुढे बोलताना ते म्हणाले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*