बापरे! डिझेलनं पुन्हा एकदा पेट्रोलला पछाडत गाठला नवा उच्चांक; वाचा दर

दिल्ली :

आधीच हलका झालेला खिसा सरकारच्या या भाववाढीच्या निर्णयामुळे आता रिकामाच होणार असे दिसत आहे. सामान्य लोक मोठ्या आर्थिक संकटात सापडले असताना असा महागाई वाढवणारा निर्णय घेणे लोकांना आर्थिक खाईत ढकलण्यासारखे आहे, अशा प्रतिक्रिया जनसामान्यांतून उमटत आहे. गेल्या महिन्यातही डिझेलच्या दरानं पेट्रोलच्या दराला मागे सोडलं होतं, आज पुन्हा एकदा नवी दिल्लीत पेट्रोलपेक्षा डिझेल महाग झालं आहे.

दिल्लीत एक लीटर डिझेलचा दर 81.05 रुपये प्रति लीटरवर आला आहे. पेट्रोलचे भावामध्ये कोणत्याही वाढीची नोंद झालेली नाही. पेट्रोलची किंमत 80.43 रुपये प्रति लीटरवर स्थिर आहे. त्यानुसार रविवारी तेल कंपन्या डिझेलच्या दरात 16 पैसे प्रति लीटर वाढ केली. प्रत्येक राज्यात पेट्रोल आणि डिझेलवर वेगळ्या स्थानिक विक्रीची कर किंवा मूल्य वर्धित कर (व्हॅट) लावला जातो. या कारणास्तव राज्यानुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात.

असे आहेत आजचे दर :-

दिल्ली- पेट्रोल 80.43 रुपये आणि डिझेल 81.05 रुपये लिटर
मुंबई- पेट्रोल 87.19 रुपये आणि डिझेल 79.27 रुपये लीटर आहे.
कोलकाता- पेट्रोल 82.10 रुपये आणि डिझेल 76.17 रुपये लीटर आहे.
चेन्नई- पेट्रोल 83.63 रुपये आणि डिझेल 78.11 रुपये लीटर आहे.
नोएडा- पेट्रोल 81.08 रुपये आणि डिझेल 73.0 रुपये लीटर आहे.
गुरुग्राम- पेट्रोल 78.64 रुपये आणि डिझेल 73.19 रुपये लीटर आहे.
लखनऊ- पेट्रोल 80.98 रुपये आणि डिझेल 72.91 रुपये लीटर आहे.
पाटणा- पेट्रोल 83.31 रुपये आणि डिझेल 77.89 रुपये लीटर आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*