हार्दिक ‘कार्यकारी’ झाल्याने ‘चाणक्य’ना झटका; परंतु, ती पक्षाची गरजही..

पटेल (पाटीदार) समाजाचे फायरब्रांड नेते व गुजराती तरुणाईचे आवडते नेते म्हणून हार्दिक पेटल यांनी आपला ठसा उमटवला आहे. अवघ्या २६ वर्षीय हार्दिक यांनी राष्ट्रीय स्तरावर आपली छाप पडलेली आहे. त्यामुळे गुजरातमध्ये कॉंग्रेस पक्षाला जनाधार देण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आता त्यांच्यावर आलेली आहे. मात्र, राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षात अगोदरपासुनच चाणक्य म्हणून आपली ओळख पक्की केलेल्या खासदार अहमद पटेल यांना यामुळे मोठा झटका बसला आहे.

काँग्रेस म्हणजे ढढ्ढाचार्य मंडळींचा पक्ष अशीच सध्याच्या भारतीय तरुणांची मानसिकता आहे. त्याला छेद देण्यासाठी नव्यांचा व जुन्यांचा मेळ घालूनच कॉंग्रेसला यापुढे काम करावे लागणार असेच दिसत आहे. तसाच प्रकार आता यानिमित्ताने पुन्हा एकदा अधिरेखीत झाला आहे. त्याला कारण ठरले आहे ते राजस्थान कॉंग्रेस पक्षामधील सत्ताकारणाचे.. कारण मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना काटशह देण्यासाठी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी थेट बंद पुकारले आहे. तिथे कॉंग्रेस पक्षाची सत्ता असताना हा घोळ सुरू आहे. तर, गुजरातमध्ये वर्षानुवर्षे सत्ता नसतानाच गोंधळाची परिस्थिती आहे. त्यालाच वेसन घालण्याची जबाबदारी आता हार्दिक पटेल यांच्याकडे देण्यात आलेली आहे. त्यांना प्रदेश कॉंग्रेसचे मुखिया केल्याने आता या विरोधी पक्षाला खऱ्या अर्थाने ताकद मिळण्याची शक्यता आहे.

मागील निवडणुकीत गुजरातमध्ये कॉंग्रेस पक्षाचा निसटता पराभव झाला. स्थानिक नेतृत्व विश्वासार्ह नसल्याने अशी परिस्थिती होती. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी व मंत्री अमित शाह यांचे हे गृहराज्य असल्याने इथे भाजप खूप सक्षम आहे. इथलेच राष्ट्रीय नेते असलेल्या खासदार अहमद पटेल यांना मात्र मोदी-शाह यांच्या सत्तेला सुरुंग लावणे शक्य झालेलं नाही. हेच अपयश लक्षात घेऊन आता कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राहुल गांधी यांच्या सल्ल्याने गुजरातला नव्या दामाचा नेता दिला आहे. त्याने अहमद पटेल यांना काय वाटते यापेक्षा गुजरात कॉंग्रेस पक्षाला काय वाटते हे महत्वाचे आहे. आणि त्यांनी तर सकारात्मक प्रतिसाद देऊन या निवडीचे स्वागतही केले आहे. म्हणजेच कार्यकर्त्यांनी गुजरात कॉंग्रेसला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत की..!

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*