नगरकरांसाठी गुडन्यूज; गेल्या २ दिवसात ‘एवढे’ करोनाबाधित घरी परतले

अहमदनगर :

दिवसेंदिवस नगर शहरासह जिल्ह्यात करोनाचे संकट गडद होत असल्याचे चिन्हे आहेत. तरीही एक दिलासादायक बातमी नगरकरांसाठी आहे. जिल्ह्यात आज १५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या आता ६४९ ला टेकली आहे.

आज नगर शहर ०७, श्रीरामपूर ०७, राहाता, श्रीगोंदा आणि जामखेड येथील प्रत्येकी ०१, असे १५ जण झाले बरे झाले आहेत, अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून मिळाली आहे. आता एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ९६३ वर पोहोचली असून त्यापैकी २९२ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कालही जिल्ह्यात ६६ करोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली होती. ६६ पैकी संगमनेर ३५, नगर शहर १६, जामखेड, कर्जत, पारनेर प्रत्येकी २, श्रीगोंदा ०५, अकोले, बीड, शेवगाव, नगर ग्रामीण प्रत्येकी ०१ बरे झालेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*