नवा ट्वीस्ट : तर काँग्रेस करणार पायलट यांच्यावर कारवाई

दिल्ली :

राजस्थानमधील सरकार आता टिकणार की पडणार असे चित्र असताना उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी असा दावा केला आहे की त्यांना 30 आमदारांचा पाठिंबा आहे आणि अशोक गहलोत यांच्या नेतृत्वात असणारे सरकार अल्पसंख्याक आहे. अखेरीस या राजकीय परिस्थितीत भाजप ‘वेट अँड वॉच’ मोडमध्ये आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक आज आयोजित केली आहे. या बैठकीत सचिन पायलट सहभागी होणार नसल्याची माहिती आहे. सचिन पायलट विधिमंडळ पक्षाच्या बैठकीस उपस्थित न राहिल्यास पक्ष शिस्तभंगाची कारवाई करण्याची शक्यता आहे.

काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाची आज महत्त्वपूर्ण बैठक होत असून या बैठकीनंतर भाजप पावलं उचलणार असल्याची माहिती आहे. कर्नाटक, मध्य प्रदेशात सत्तांतर घडवून आणल्यानंतर आता भाजपने राजस्थानकडे आपला मोर्चा वळवला आहे. राजस्थानचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट पक्षावर नाराज आहेत. अशातच काँग्रेसकडे असलेल्या आमदारांपैकी जवळपास 30 आमदार हे पायलट गटाचे असल्याची माहिती आहे. त्यामुळे सचिन पायलट यांनी वेगळी भूमिका घेतल्यास काँग्रेस सरकार कोलमडणार हे निश्चित आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*