सचिन पायलट यांच्याजागी प्रदेशाध्यक्षापदी असू शकतात ‘हे’ नेते

जयपूर :

राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी  ३० आमदार आपल्यासोबत घेऊन दिल्ली गाठली आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता सांगितली जात आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक आज आयोजित केली आहे. या बैठकीत सचिन पायलट सहभागी होणार नसल्याची माहिती आहे. सचिन पायलट विधिमंडळ पक्षाच्या बैठकीस उपस्थित न राहिल्यास पक्ष शिस्तभंगाची कारवाई करण्याची शक्यता आहे. तसेच मुख्यमंत्री अशोक गहलोत हे पायलट यांच्यावर पक्षविरोधी कारवाई करु शकतात. सचिन पायलट यांच्या जागी रघुवीर मीना यांना प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बनवले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सरपंच, विधानसभा आणि त्यानंतर ते लोकसभा असा संघर्ष करत राजकीय प्रवास करणारे रघुवीर मीणा हे राजस्थानच्या राजकारणातील मोठे नेते असून अशोक गहलोत यांचे जुने व निकटवर्ती सहकारी अशी त्यांची ओळख आहे. युवा काँग्रेसपासून राज्य काँग्रेस कमिटीपर्यंत रघुवीर मीणा यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. 2005 ते 2011 पर्यंत ते राजस्थान काँग्रेसचे सरचिटणीस होते आणि प्रदेश उपाध्यक्ष देखील होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*