औरंगाबादमध्ये करोनाचा हाहाकार; ३५४ बळी, गेल्या २४ तासांत वाढले ‘एवढे’ रुग्ण

औरंगाबाद :

लॉकडाऊन शिथिल करण्यापूर्वी औरंगाबादमध्ये रुग्ण वाढतच होते. पण जसे वातावरण शिथिल होऊ लागले तसे रुग्णांचे प्रमाण वाढले. रोज सरासरी ९० ते १२० यादरम्यान नवे रुग्ण आढळत आहेत. तसेच औरंगाबादमध्ये मृत्युसंख्याही वाढत आहे. आजपर्यंत औरंगाबादमध्ये करोनाने ३५४ बळी घेतले आहेत. तर आज एका दिवसात ११३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

करोनाबाधितांची संख्या ८५७७ झाली आहे, तर आतापर्यंत ५०६१ बाधित हे करोनामुक्त झाले असून, सध्या ३१६२ बाधितांवर उपचार सुरू आहेत. औरंगाबादमध्ये करोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. दिवसेंदिवस करोनाबाधीतांची संख्या वाढतच आहे. दिवसेंदिवस वाढणारे करोनाचे रुग्ण आणि त्यामुळे होणारे मृत्यू यामुळे औरंगाबादकरांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. 

दरम्यान वाढत्या रुग्णावाढिला आळा घालण्यासाठी औरंगाबाद शहरात ‘केरळ पॅटर्न’ राबवला जाणार असल्याची माहिती महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिली होती. ‘केरळ पॅटर्न’ची तातडीने अंमलबजावमी सुरू केली जात आहे, असेही त्यांनी सांगितले होते. त्यानंतर स्वतः आस्तिककुमार पांडेय यांनाच विलगीकरणात ठेवावे लागले होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*