ऐन राजकीय गोंधळात ‘या’ कॉंग्रेस निकटवर्तीयांच्या घरावर आयकर विभागाचे छापे

जयपूर :

राजस्थानमधील सरकार आता टिकणार की पडणार असे चित्र असताना उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी असा दावा केला आहे की त्यांना 30 आमदारांचा पाठिंबा आहे आणि अशोक गहलोत यांच्या नेतृत्वात असणारे सरकार अल्पसंख्याक आहे. अखेरीस या राजकीय परिस्थितीत भाजप ‘वेट अँड वॉच’ मोडमध्ये आहे. अशा परिस्थितीत अचानक राजस्थान कॉंग्रेसच्या निकटवर्तीयांच्या घरावर आयकर विभागाने छापे मारले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीव अरोडा आणि धर्मेंद्र अरोडा यांच्या सुमारे २४ ठिकाणांवर ही छापेमारी सुरू आहे.  हे दोघेही मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे समजले जातात. राजीव अरोडा आणि धर्मेंद्र राठोड यांनी देशाबाहेर केलेल्या ट्रान्झॅक्शनबाबत चौकशी केली जाऊ शकते.

हे छापे मारताना आयकर विभागाने स्थानिक पोलिसांना कोणतीही सूचना केलेली नाही. त्यातच कॉंग्रेसने भारतीय जनता पक्ष गहलोत सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप केला आहे. यावर भाजपने ‘करोनाचा उद्रेक झाल्यामुळे आयकर विभागाने आपली छापेमारी स्थगित केली होती. आता पुन्हा आयकर विभागाने छापेमारी सुरू केली आहे’, असे सांगितले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*