‘या’ कॉंग्रेस नेत्याने राजस्थानबद्दल लावलेले अंदाज ठरताहेत खरे

दिल्ली :

कॉंग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी तसेच कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी आधीच सांगितले होते की, भाजप हा कुठल्या ना कुठल्या प्रकारे कॉंग्रेस नेत्यांवर दबाव आणू शकतो. लगेच काही वेळात अचानक राजस्थान कॉंग्रेसच्या निकटवर्तीयांच्या घरावर आयकर विभागाने छापे मारले आहेत. राजीव अरोडा आणि धर्मेंद्र अरोडा यांच्या सुमारे २४ ठिकाणांवर ही छापेमारी सुरू आहे.  हे दोघेही मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे समजले जातात.

यावेळी ‘आख़िर भाजपा के वकील मैदान में आ ही गए। इनकम टैक्स विभाग ने जयपुर में रेड शुरू कर दी। ई डी कब आएगी?’, असे ट्वीट सुरजेवाला यांनी केले होते. आता ई डी जयपूरमध्ये पोहोचली आहे. त्यामुळे पुन्हा ‘भाजपा का दूसरा अंग्रिम संगठन भी मैदान में आया, ई.डी भी जयपुर आ ही गई, जैसा कहा था। अब CBI कब आएगी?’, असे म्हणत सुरजेवाला यांनी ट्वीट केले आहे.

हे छापे मारताना आयकर विभागाने स्थानिक पोलिसांना कोणतीही सूचना केलेली नाही. त्यातच कॉंग्रेसने भारतीय जनता पक्ष गहलोत सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप केला आहे. यावर भाजपने ‘करोनाचा उद्रेक झाल्यामुळे आयकर विभागाने आपली छापेमारी स्थगित केली होती. आता पुन्हा आयकर विभागाने छापेमारी सुरू केली आहे’, असे सांगितले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*