त्याच्या कुटुंबानेही सोडली होती अशा; देवदास पाहतानाच आली भारताच्या विजयाची बातमी..!

क्रिकेट हा शक्यतांच्या पलीकडचा खेळ असल्याचे अनेकदा सिद्ध झालेले आहे. असाच प्रकार बरोबर १८ वर्षांपूर्वी पाहायला मिळाला होता. त्यावेळी १९८३ नंतर भारताला विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यानंतर दुसऱ्यांदा लॉर्ड्स (क्रिकेट पंढरी) मैदानावर दुसऱ्यांदा विजय मिळाला होता. तेही एका नवख्या अष्टपैलू खेळाडूमुळे.. ज्याचे नाव होते मोहम्मद कैफ..!

त्या दिवशी हा तत्कालीन नवखा खेळाडू फिफ चढल्यागत खेळला. युवराज सिंग आणि त्याने सहाव्या विकेटसाठी १०६ चेंडूंमध्ये १२१ धावा कुटल्या. परिणामी इंग्लंड टीमची पिसे निघाली आणि भारताला मोठा विजय मिळाला. त्यामध्ये कैफने ७५ बॉलमध्ये ८७ धावा कुटल्या होत्या. तर, त्याचा साथीदार असलेल्या युवराजने ६३ चेंडूमध्ये ६९ धावा केल्या होत्या.

अगोदर खेळताना इंग्लंड टीमने ३२६ धावांचा डोंगर उभा केला होता. भारताचे २४ ओव्हरमध्ये फ़क़्त १४५ धावा (रन) झालेले होते. त्यावेळी सचिन तेंडूलकर आणि इतर दिग्गज खेळाडू आउट झालेले होते. मग भारत सामना हरणार असेच चित्र असल्याने ८० टक्के भारतीयांनी टीव्ही बंद करून पळ काढला. अगदी कैफ याचे वडील मोहम्मद तारिफ (जे की स्वत: ७३ प्रथम श्रेणी सामने खेळले होते) आणि भाऊ यांनीही आस सोडून थेट चित्रपट थेटर गाठले. त्यावेळी कैफचे सगळे कुटुंबीय शाहरुख खानचा देवदास सिनेमा पाहत होते. मात्र, युवराज आणि कैफने हा विजय मिळवला. मग इलाहाबाद येथील त्या सिनेमागृहातून क्रिकेट चाहत्यांनी कैफच्या ई-वडिलांची जंगी मिरवणूक काढून हा विजय दणक्यात साजरा केला. आणि साहजिकच कैफची ओळखही पक्की झाली.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*