मोबाईल वापरताना ‘ही’ घ्या काळजी नाहीतर…

आजकाल मोबाईल हा श्वासांपेक्षाही प्रिय झाला आहे. नाते, मित्र सगळे नंतर आधी मोबाईल येतो. सकाळी उठल्या उठल्या कितीतरी लोक मोबाईल वापरायला सुरु करतात. मग बाकीची कामे करतात. आजकालची तरून पिढी ही मोबाईलच्या आहारी गेली आहे. मोबाईल चार्जिंगला लावून वापरल्यामुळे कित्येकदा स्फोट घडले आहेत. मोबाईल गरम झाला तरी वापरल्यामुळे अनेक अनर्थ घडलेले आहेत. त्यामुळे या टिप्स वाचा, इतरांनाही वाचायला पाठवा.  

  • उन्हात फिरताना मोबाईल उन्हाच्या संपर्कात येऊ देऊ नका.
  • मोबाईलसाठी जाड कव्हर वापरू नये. जाड कव्हरमुळे मोबाईल मधली उष्णता बाहेर पडत नाही. एकावेळी दोन तीन अॅप्सचा वापर करताना कव्हर काढून ठेवा.
  • मोबाईल जास्तवेळ चार्ज करू नका. यामुळे एक तर बॅटरीचं आयुष्य कमी होतं आणि त्याच बरोबर मोबाईलचं तापमान देखील वाढतं. जर चार्जिंग करताना मोबाईल गरम झाला तर चार्जिंग बंद करा.
  • प्रोसेसिंग पॉवर आणि ग्राफिक्सचा मोठ्या प्रमाणात वापर करणाऱ्या अॅप्स कमी वापर करा.
  • रात्रभर मोबाईल चार्ज करू नका. काही स्मार्ट फोन्स बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर चार्जिंग थांबवतात. नवीन मोबाईल घेताना अशा मोबाईल फोन्सची निवड करा. थंड होऊ द्या.
  • इंटरनेट वापरताना किंवा फोनवर बोलताना मोबाईल गरम झाला तर त्याचा वापर लगेचच थांबवा. कव्हर काढून त्याला थंड होऊ द्या.
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*