धारावी करोनामुक्त करणाऱ्या RSS च्या मुख्यालयाचे काय; शेट्टी यांचा मर्मभेदी सवाल

मुंबई :

मुंबई महापालिकेची आरोग्य यंत्रणा, राज्य सरकारचा आरोग्य विभाग, काही सामाजिक संस्था व खासगी डॉक्टर यांनी मिळून धारावी या सर्वाधिक मोठ्या झोपडपट्टी भागातील करोना आटोक्यात आणला आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले आहे. त्याचे श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात RSS चे असल्याचा दावा भाजप करीत आहे. त्यावरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी मर्मभेदी प्रश्न केला आहे.

त्यांनी कोल्हापुरात टीव्ही ९ मराठीला बोलताना हा कळीचा मुद्दा उपस्थित केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि अनेकांनी डॉक्टर व आरोग्य यंत्रणेचे हे यश हिरावून घेऊन थेट संघाला दिले आहे. त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते शेट्टी यांनी म्हटले आहे की, एकवेळ हे त्यांचे म्हणणे मान्य करू. पण मग संघाचे मुख्यालय ज्या नागपूरमध्ये आहे तिथेच बरे त्यांना सगळ्यांना करोनामुक्त करता आलेले नाही..!

नागपुरात कोरोनाचा कहर कसा? तिथला कोरोना अटोक्यात का नाही असे विचारून त्यांनी संघाचा हा श्रेय घेण्याचा दावा खोटा असल्याकडे लक्ष वेधले आहे. इचलकरंजी शहरात कोरोनाचा हाहाकार आहे. इतरही अनेक शहरात कोविड १९ चे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे संघस्वेयंसेवकांनी तिथे करोनामुक्तीचे काम करायला हरकत नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*