नागपुरात RSS चे कार्यकर्ते नाहीत का; ‘या’ नेत्याचा सवाल

मुंबई :

रेड झोनमधून ग्रीन झोनकडे धारावीची वाटचाल सुरू आहे. ‘धारावीत आरएसएसच्या स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून प्रत्येक घरात जाऊन स्क्रिनिंग केलं, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. याच पार्श्वभूमीवर ‘संघाच्या स्वयंसेवकांनी अहोरात्र काम करून धारावी करोनामुक्त केली असेल तर संघाचे मुख्यालय जिथं आहे, त्या नागपुरात करोनाचा कहर कसा? तिथं संघाचे कार्यकर्ते नाहीत का, असा रोखठोक सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे.

‘खरंतर धारावीत जेव्हा करोनाचा उद्रेक झाला होता, किड्या मुंग्याप्रमाणे माणसं मरत होती, तेव्हा आरएसएसचे कार्यकर्ते मदत करताहेत किंवा जीव धोक्यात घालून काम करताहेत अशी कुठलीही बातमी कुठेही वाचनात किंवा पाहण्यात आलं नाही. मात्र, धारावीतील परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) सांगताच सगळे श्रेय घेण्यासाठी पुढं आले’,असे म्हणत शेट्टींनी भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला.

सर्वात आधी भाजप आमदार नितेश राणे यांनी म्हटले होते की, धारावीसारख्या परिसराला करोनामुक्त करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर समाजसेवी संस्था रात्रंदिवस कुठलाही गाजावाजा न करता काम करत होत्या. आता धारावी करोनामुक्त होण्याकडे वाटचाल करत असताना त्याचे संपूर्ण श्रेय राज्य सरकारला देणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या समाजसेवी संस्थांवर अन्याय आहे.  

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*