मोदींसोबत बैठक झाल्यावर गुगलचे सीईओ सुंदर पिचईंनी केली ‘ही’ मोठी घोषणा

दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांची आज एक व्हर्चुअल बैठक झाली होती. त्यानंतर अवघ्या काही तासांतच सुंदर पिचई यांनी भारतासाठी एक मोठी घोषणा केली असून ‘येत्या ५-७ वर्षात ७५ हजार कोटी रुपये म्हणजे म्हणजेच १० बिलियन डॉलर्स भारतात गुंतवणार’ असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पुढे त्यांनी भारतीयांना तंत्रज्ञान आपापल्या मातृभाषेत उपलब्ध करुन देण्यासाठी गुगल पुढाकार घेणार असल्याचीही माहिती दिली.

या गुंतवणुकीचे वैशिष्ट्ये म्हणजे ही गुंतवणूक विविध क्षेत्रात असेल. आरोग्य, शिक्षण आणि कृषी या क्षेत्रातील सामाजिक कामांसाठी तंत्रज्ञान आणि आर्टिफिशिअल इंटिलिजन्सचा वापर केला जाईल. गुगल इंडियाचा वार्षिक कार्यक्रम यावेळी ऑनलाइन पार पडला.या कार्यक्रमात त्यांनी सदर घोषणा केली.

भारताने नाविन्यतेच्या लाटेचा फायदा करुन घ्यावा एवढंच आमचं ध्येय नाही, तर भारताने याचं नेतृत्त्व करावं, असेही पुढे ते म्हणाले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*