रोज सकाळी प्या लसणाचा चहा; मिळवा ‘हे’ चमत्कारिक फायदे…

लसून खाण्याचे किंवा वापरण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. दैनंदिन आहारात आपण लसणाचा वापर सर्रास करत असतो. तसेच आपण रोज चहा पीत असतो. पण आजवर तुम्ही लसणाचा चहा प्यायलात का? शक्यतो नसेलच. मग नक्कीच प्या. आणि आरोग्यदायी फायदे मिळवा.

लसणाचा चहा बनवण्यासाठी ही आहे रेसिपी :-

लसणाचा चहा बनवण्यासाठी तुम्हाला लागते 1 लसणाची कळी, 2 छोटे ग्लास पाणी, 1 चमचा मध, 1 चमचा लिंबूचा रस आणि 1 चमचा किसलेले अद्रक. हे सर्व सामुग्री जमा केल्यानंतर अगोदर एक ग्लास पाणी उकळून घेऊन त्यात लसूण आणि अद्रक पेस्ट टाका. 15 मिनिटे कमी आसेवर त्याला शिजू द्या. चांगली उकळी आल्यानंतर त्याला 10 मिनिट तसेच ठेवा. त्यानंतर ते गाळून त्यात एक चमचा मध टाका. तुमचा लसणाचा चहा तयार होईल.

हे आहेत फायदे :-

1. सकाळी रिकाम्या पोटी हा चहा पिणे आरोग्यासाठी खूप लाभदायी ठरते. यामुळे शरीराचं मेंटबॉलीसम आणि पचनक्रिया चांगली राहते.

2. लसूण हृदयरोगासाठी फायद्याचा असतोच. पण हा चहाही त्यासाठी खूप फायद्याचा ठरतो. लसणाच्या चहामुळे ब्लड सर्कुलेशन सामन्य राहते.

3. हा चहा शरीरातील अधिकचे फॅट्स बरं5करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. या चहाचे सेवन केल्यास शरीरातील टॉक्सिक पदार्थ दूर होतात.

4. लसणाच्या चहामुळे इम्युनिटी वाढते. कोलेस्ट्रॉल ज्यांचं नेहमी वाढलेलं असते त्यांच्यासाठी तर हा चहा खूपच उपयुक्त ठरतो.

5. लसणाच्या चहातुन आपल्याला अँटिबायोटिक मिळते. ज्यामुळे सर्दी, खोकला या समस्या दूर होतील.

  

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*