भाजप प्रवक्त्यांनी पवारांना म्हटले ‘नेहमीचेच अयशस्वी कलाकार’..!

मुंबई :

पंतप्रधान पदावर संधी न मिळालेले कार्यक्षम नेता म्हणून शरद पवार मागील अनेक वर्षांपासून देशभरात चर्चेत असतात. आताही त्यांनी करोना कालावधी संपला की देशातील सर्व विरोधी पक्षांशी मोट बांधून भाजपला सत्तेतून पायउतार करण्याबद्दल एका मुलाखतीत म्हटले आहे. तोच धागा पकडून भाजपचे महाराष्ट्रातील प्रवक्ते अवधूत वाघ यांनी पवार साहेबांना ‘नेहमीचेच अयशस्वी कलाकार’ म्हटले आहे. त्यांनी थेट शरद पवारांचे नाव न घेता त्यात SP असा उल्लेख केला आहे.

त्यांनी एक पोस्ट ट्विटरवर शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, SP for PM 1999.. SP for PM 2004.. SP for PM 2009.. SP for PM 2014.. SP for PM 2019.. या सर्व पडेल चित्रपटांच्या (अप) यशानंतर NCP Movies.. लवकरच घेऊन येत आहे, एक नवा कोरा इस्टमनकलर चित्रपट SP for PM 2024.. कलाकार : नेहमीचेच अयशस्वी..

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*