तर काजू तुमच्यासाठीही ठरतील घातक; वाचा अधिक माहिती

सर्वसाधारणपणे लहान मुलांना, कमी वजन असलेल्या किंवा आजारी व्यक्तीला काजू खाऊ घातले जातात. कारण काजूने वजन वाढते, काजू हे आरोग्यदायी असतात तसेच काजूमुळे लहान मुलांची बुद्धी तल्लख होते. काजूमध्ये फायबर, प्रोटिन, आयर्न आणि कित्येक प्रकारचे अँटिऑक्सिडंट घटक असतात. घरात ठराविक कारणाने आणलेले काजू सर्रास सगळेच खात असतात. काही लोकांनी काजू खायचे टाळणे गरजेचं आहे.

यांनी खाऊ नये काजू :-

  • हाय ब्लड प्रेशर म्हणजे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची काजू खाऊ नयेत. काजूमध्ये सोडिअम भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे रक्तदाब वाढतो.
  • लठ्ठ व्यक्तीनी काजू खाऊ नये. कारण काजूमध्ये फॅट जास्त असतं. एका अभ्याासनुसार 30 काजूमध्ये 163 कॅलरीज आणि 13.1 ग्रॅम फॅट असतं. ज्यांचं वजन आधीपासून वाढलेलं आहे, त्यांनी काजू खाणं टाळावं.
  • ज्यांच्या पित्ताशयात खडे आहेत, त्यांनी काजूचं सेवन टाळावं.
  • काजूमध्ये फॅट असल्याने ते पचायलाही जड जातात. शिवाय त्यात फायबर जास्त असतं, ज्यामुळे गॅसची समस्या उद्भवू शकते. जास्त काजू खाल्ल्याने पोटात सूजही येऊ शकते. त्यामुळे ज्यांना पोटांसंबंधी समस्या आहेत, अशा व्यक्तींनीदेखील काजू खाणं टाळावं.
  • मायग्रेनची समस्या असलेल्यांनीही काजू खाऊ नये. काजूमध्ये भरपूर प्रमाणात अॅसिड असतं, ज्यामुळे डोकेदुखी अधिक वाढते.
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*