सांगताय काय; लिंबाची साल आहे प्रचंड फायदेशीर, वाचा फायदे

लिंबू आपण खाण्यापासून तर आजारांपर्यंत अशा अनेक गोष्टींसाठी वापरतो. लिंबू हा आपल्या दैनंदिन जीवनातील वापराचा पदार्थ आहे. पण आपण फक्त लिंबाचा रस वापरात आणतो. त्याची सालही कामाची आहे मंडळीहो…. लिंबाच्या सालीचे फायदे वाचून आश्चर्यचकित व्हाल.

जाणून घ्या फायदे :-

  • आपल्या शरीराच्या कुठल्याही भागात वेदना होत असतील तर या लिंबाच्या सालीचा लेप खूप फायदेशीर आहे. कारण लिंबाच्या सालीत कॅल्शीयम, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि फायबर यांचे उच्च गुणधर्म असतात. आता सर्वप्रथम लिंबाची केवळ पिवळी सालच काढा. आतला गर काढणार आहे. या सालीचा लेप तयार करा. हा लेप शरीरावर ज्या ठिकाणी वेदना होत असतात त्या ठिकाणी हा लेप लावा. लेप लावल्यानंतर त्या ठिकाणी एका कापडाने हलकं बांधा. लेप हलणार नाही किंवा खाली पडणार नाही याची काळजी घ्या.
  • हा लेप बनवण्यासाठी लिंबाच्या साली काढा. या साली एका काचेच्या भांड्यात काढून घ्या. यामध्ये ३-४ चमचे ऑलिव्ह ऑइल मिसळून काचेचे भांडे बंद करा. या साली १५ दिवस मुरू द्या त्यानंतर त्या तुम्ही वापरू शकता. १५ दिवस या साली तेलात मुरल्यावर त्या तेलाने अवयवांना मालीश करा. काही काळ हे तेल शरीरावर तसेच ठेवा. थोड्या वेळाने पाण्याने अवयव स्वच्छ धुवून काढा.
  • लिंबाच्या सालीत व्हिटॅमिन सी आणि कॅल्शिअम अधिक प्रमाणात असते ज्यामुळे शरीरातील हाडे मजबूत होण्यासाठी फायद्याचे ठरते. आपल्याकडे लिंबूचे लोणचेही बनवले जाते. लिंबूच्या साली आर्थराइटिस आणि ऑस्टियोपोरोसिसवर गुणकारी असतात.
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*