‘त्या’ पाचजणांनी वाचवली राजस्थान कॉंग्रेसची खुर्ची; नाहीतर बट्ट्याबोळ होणार होताच..!

जयपूर :

राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचे बंड अपयशी ठरले आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा आततायीपणा आणि पायलट यांच्या महत्वाकांक्षेमुळे येथे काँग्रेसचे सरकार जातेय की काय असेच चित्र दोन दिवस होते. मात्र, अखेरीस राष्ट्रीय काँग्रेसच्या पाच शिलेदारांनी यामध्ये योग्य अशी समन्वयाची भूमिका ठेऊन हे सरकार पडण्यापासून वाचवले आहे.

कॉंग्रेसचे दिल्लीतील नेते गेहलोत यांच्या पाठीमागे यावेळी ठाम उभे राहिले. कारण काहीही असले तरी पायलट यांनी पक्षाशी बंड पुकारले होते तर गेहलोत अजूनही केंद्रीय नेतृत्वाला प्रतिसाद देत होते. आपलेच मित्र असलेल्या राहुल गांधी यांचा फोनही उचलण्याची तसदी पायलट घेत नसल्याने अखेरीस पाचजणांच्या टीमने गेहलोत यांच्यासाठी सर्व बळ एकवटून प्रयत्न केले आणि संख्याबळ शाबित असल्याचे दाखवून दिले. आता गेहलोत यांच्याकडे १०९ इतके आमदार आहेत.

हे नेते बनले संकटमोचक :

१. रणदीप सुरजेवाला (राष्ट्रीय प्रवक्ते)

२. अविनाश पांडे (राजस्थान कॉंग्रेसचे प्रभारी)

३. अजय माकन (ज्येष्ठ नेते, दिल्ली)

४. के. सी. वेणुगोपाल (महासचिव)

५. प्रियंका गांधी-वाड्रा (कॉंग्रेस कार्यकर्ता)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*