संडासला खूप वेळ लागत असेल तर ‘हे’ आहेत उपाय

बहुतांश लोकांना विविध कारणांमुळे संडासला खूप वेळ लागतो. त्याचा परिणाम शरीरावरही होत असतो. जर तुम्हाला व्यवस्थित संडास होत नसेल तर समजून घ्या की हा तुमचे शरीर काहीतरी धोक्याची सूचना देत आहे. तुमचे पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर तुम्ही निरोगी नसल्याचे ते लक्षण आहे. सध्याची धावपळीची जीवनशैली, खानपान पद्धती, आरामदायी जीवन आणि शरीरास अयोग्य आहार या सर्व गोष्टींमुळे बद्धकोष्ठ्ता जडण्याचे प्रमाण लोकांमध्ये वाढताना दिसत आहे. कमी पाणी पिणे आणि कमी वेळेत जेवणे या छोट्या गोष्टीसुद्धा आपल्या शरीरावर परिणामकारक असतात. या सगळ्याचा थेट परिणाम आपल्या संडास करण्याच्या वेळेवर होत असतो. आपल्या शरीरात काहीतरी गडबड असते म्हणून संडास व्हायला वेळ लागतो.

जाणून घ्या उपाय :-

१) सकाळी रिकाम्या पोटी घेतलेले लिंबुपाणी पोट साफ करण्यास मदत करते. तसेच या मिश्रणात मीठ टाकल्यास शौचास सुलभ होण्यास मदत होते.

२) संत्र हे व्हिटामिन ‘सी’ व फायबरने समृद्ध आहे. फळांतील फायबरमुळे पोट साफ होते . सकाळ संध्याकाळ संत्र खाण्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.

३) एरंडेल तेल हा बद्धकोष्ठतेवरील फार जुना उपचार आहे. या तेलामुळे आतड्यातील जंतू मरतात. जर तुम्हाला एक चमचा एरंडेल तेल पिणे शक्य नसल्यास ते ग्लासभर दुधात एकत्र करून रात्री प्यावे.

४) अंजीर तुम्हाला फायबर तर पुरवतेच पण बद्धकोष्ठतेवरही अतिशय गुणकारी आहे.

५) रात्रभर पाण्यात भिजवलेले काळी मनुका सकाळी पाण्यासकट खाल्याने फायदा होतो.

६) पालक शरीरातील आतड्यांचा मार्ग स्वच्छ करून पुनरुजीवीत करण्यास मदत करतो. 100 मिली पालक रस व पाणी समप्रमाणात रोज पाण्यासोबत दोनदा घेतल्यास बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*