गुगल करणार ७५,१७९ कोटींची गुंतवणूक; मोदींशी झाली CEO ची चर्चा..!

मुंबई :

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांच्यामध्ये आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली. त्यामध्ये या दोघांमध्ये भारतीय शेतकरी, व्यावसायिक आणि तरुणाई यांच्यासमोरील संधी व आव्हाने यावरही चर्चा झाली. त्यानंतर गुगलने भारतात ७५ हजार १७९ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.

मोदींच्या महत्वाकांक्षी  ‘डिजिटल इंडिया’ अभियानाला यामुळे मोठी ताकद मिळणार आहे. शिक्षण आणि डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात google ही मोठी गुंतवणूक करणार असल्याचे समजते. त्यामुळे किती मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतील हे काही अजूनही जाहीर झालेले नाही.

याबाबत ट्विटरवर मोदीजी म्हणतात की, आज सुंदर पिचई यांच्याशी चर्चा केली. त्यामध्ये टेक्नोलॉजी आणि इतरही महत्वाच्या विषयावर सविस्तर बोललो. भारतीय शेतकरी, व्यावसायिक आणि तरुणाई यांच्यासमोरील संधी व आव्हाने यावरही चर्चा केली. हा वार्तालाप खूप चांगला झाला.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*