आता भाजपची तिरकी चाल; पायलट नाही आले तर काँग्रेस होईल बेहाल..!

जयपूर :

राजस्थान कॉंग्रेसमधील अंतर्गत भांडणामुळे आता खऱ्या अर्थाने भाजपला पुन्हा एकदा या राज्यात कमळ फुलवण्याची संधी वाटू लागली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जरी पूर्ण बहुमत असल्याचा दावा केलेला असला तरी ते सिद्ध करण्याचे आव्हान भाजपने दिले आहे.

उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची तयारी अजूनही दाखवलेली नाही. त्याचवेळी त्यांच्याकडे एकूण १९ आमदार असल्याचा दावाही केला जात आहे. त्याचवेळी पायलट यांना परत मागे येण्याचे आवाहन कॉंग्रेस पक्ष करीत आहे. त्यासाठी प्रियांका गांधी यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे. तरीही जर पायलट पुन्हा कॉंग्रेसमध्ये आलेच नाही तर बहुमत सिद्ध करताना ते कोणाकडून मतदान करणार यावर राजस्थानचे गणित ठरणार आहे.

पायलट यांनी जर विरोधात मतदान केले तरच गेहलोत यांचे सरकार पडू शकते. त्यांनी जर मतदान न करता गप्प राहण्याचे जरी ठरवले तरी कॉंग्रेसला काहीही फरक पडणार नाही. एकूणच भाजपने या ठिकाणी आणखी एक खेळ करून पाहण्याची संधी साधली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*