नगरमध्ये अफवांचे पिक जोरात; खासगी बैठकीचे मेसेज व्हायरल, महापालिका अधिकृत माहिती देईना

अहमदनगर :

शेजारील औरंगाबाद व पुणे शहरात करोनाचा कहर वेगाने फैलावत असल्याने नगरमधील नागरिकांमध्ये अगोदरच भीतीयुक्त वातावरण आहे. त्यातच आता या शहरात संपूर्ण लॉकडाऊन होणार असल्याच्या अफवांचे पिक जोरात आलेले आहे. महापालिका प्रशासनाने तर यात मनमानी पद्धतीने कुठेही दुकाने बंद करण्याच्या सूचना देऊन गोंधळात भर टाकली आहे.

इतर शहरांच्या तुलनेत नगरमध्ये करोनाच्या संकटाबाबत नागरिकांनी प्रशासनाला खूप चांगले सहकार्य केले आहे. मात्र, बाहेरून आलेल्या नागरिकांचे योग्य पद्धतीने ट्रेसिंग करण्यात प्रशासनाला अपयश आल्याने मागील महिनाभरात नगरमध्ये करोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. अशावेळी जिल्हा व पोलीस प्रशासन योग्य पद्धतीने काम करीत आहेत. तर, महापालिकेत नेहमीप्रमाणे राजकारणाचा खेळ रंगात आलेला आहे. जिल्हाधिकारी यांच्या सूचनांचे पालन न करताच नगरमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यसाठी सत्ताधारी भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांनी खासगी बैठक घेऊन लॉकडाऊन लागू होणार असल्याच्या पोस्ट फिरवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांचा संभ्रम वाढला आहे.

नालेगावसह सावेडी भागात महापालिकेच्या काही बहाद्दर कर्मचाऱ्यांनी गरज नसताना अत्यावश्यक वस्तूंची दुकाने बंद करण्याचे रविवारी निर्देश देऊन गोंधळात भर टाकली आहे. त्यातच आता सोशल मिडीयामध्ये एका खासगी बैठकीची माहिती टाकून शहरात टाळेबंदी लागू होण्याच्या बातमीवजा अफवा पसरवल्या जात आहेत. त्याने गोंधळात आणखी भर टाकली आहे. महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि कामगारांचे नेते कॉम्रेड भैरवनाथ वाकळे यांनी याबाबतची पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*