म्हणून तिने मंत्र्यांच्या मुलालाही झापले; वाचा जिगरबाज पोलीस कॉन्स्टेबलची स्टोरी

सुरत :

गुजरातचे राज्यमंत्री कुमार कानाणी यांच्या मुलाने एकाच ठिकाणी एका महिला कॉन्स्टेबलला वर्षभर उभे राहण्याची शिक्षा देण्याच्या धमकीचे प्रकरण सध्या सोशल मिडीयामध्ये जोरात शेअर होत आहे. अनेक राष्ट्रीय माध्यमांनी याची दखल घेतली आहे.

सुरतमध्ये कर्फ्यू असतानाही एकाने रात्री ९ वाजता मोकाट फिरण्याचे कृत्य केले. महिला पोलीस कर्मचारी सुनीता यादव यांनी त्याला हटकले व नियम तोडल्याने २५०० रुपये दंड भरायला सांगितले. तर, या बहाद्दराने थेट एकाला फोन लावला. ज्याला फोन केला तो होता गुजरातच्या आरोग्य मंत्री कानानी यांचा मुलगा. मंत्र्यांच्या मुलाने या पोलीस महिलेला थेट एक वर्षभर आहे त्याच ठिकाणी ड्युटी देण्याची धमकी दिल्याने हे प्रकरण चिघळले. तसेच या मंत्री पुत्राने या महिलेला नोकरीवरून काढण्याचीही धमकी दिल्याचे म्हटले जात आहे.

मग हा मंत्र्यांचा मुलगा तिथे आला तोही मंत्र्यांच्या गाडीतून. मंत्री नसतानाही त्यावर त्यांच्या नावाची पट्टी लावून मुलगा फिरत होता. त्यावरही महिला पोलिसाने त्या मंत्र्यांच्या मुलाला जोरदार झापले. आता पोलीस अधिकारी या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. एकूणच यानिमित्ताने ही पोलीस कर्मचारी महिला ट्रेंडमध्ये आली आहे. तिला लाखो लोकांनी पाठींबा दिला आहे. बीबीसी हिंदीने यावर स्पेशल व्हिडिओ शेअर केला आहे. तर, फर्स्टबिहार यांनी या महिलेवर खास लेख लिहिताना तिने याप्रकरणी जर निष्पक्ष चौकशी झाली नाही तर नोकरी सोडण्याची माहिती दिल्याचा दावा केला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*