धक्कादायक | करोनाच्या प्लाझ्माविक्रीतही भामटे सक्रीय; गृहमंत्र्यांनी केले ‘हे’ आवाहन

मुंबई :

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरपी वरदान असल्याचे म्हटले जाते. मात्र, यामध्ये डोनर (दाते) पुढे येत नसल्याने ही थेरपी तुलनेने खूप महाग आहे. त्याचाच फायदा घेऊन आता सायबर भामटे बोगस सर्टिफिकेटसह प्लाझ्मा विक्रीमध्ये सक्रीय झालेले आहेत.

याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अवाह केले आहे की, ही उपयुक्त उपचार पद्धती आहे. परंतु, आता या संदर्भातही फसवणूक  होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सावधान राहावे आणि गरज पडली तर www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवावी असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.

कोविड रूग्णांना  मदत करण्यासाठी विविध राज्य व रुग्णालयांनी प्लाझ्मा बँक आणि प्लाझ्मा देणगी (डोनेशन) मोहीम सुरू केली आहे. मात्र, प्लाझ्मा देणगीदारांंच्या कमतरतेमुळे ही थेरपी महाग आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन कोरोनातून बरे झालेले बेरोजगार तरुण आवश्यकतेनुसार थेट लोकांना प्लाझ्मा दान देताना आढळले आहेत.

तर, काहींनी प्लाझ्मा दान करण्यासाठी कोविडमधून बरे झाल्याचा बनावट वैद्यकीय अहवाल आणि प्लाझ्मा दान करण्यास तंदुरुस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र देण्यासही सुरुवात केली आहे. डार्क वेब आणि बेकायदेशीर वाहिन्यांवर प्लाझ्माची विक्री संदर्भात फसवणूक केली जात आहे. त्यामध्ये न फासण्याचे आवाहन देशमुख यांनी केले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*