अखेर सचिन पायलट व्यक्त झाले; पहा काय केलेय त्यांनी ट्विट

कॉंग्रेस पक्षाने उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष अशी दोन्ही पद काढून घेऊन हकालपट्टी केल्यानंतर अखेर सचिन पायलट यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. चार दिवसांनी त्यांनी आपले मत फ़क़्त एकाच ओळीत लिहिले आहे.

त्यांनी ट्विटरवर पोस्ट केली आहे की, सत्य को परेशान किया जा सकता है पराजित नहीं। त्यांनी फ़क़्त ही एकाच ओल लिहिली आहे. त्यात ते सत्यवादी असून परेशान आहेत मात्र, पराजित कधीच होणार नसल्याचा अर्थ आहे. यापूर्वीही अनेकांनी राजकीय कारणासाठी अशी पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे आता पायलट यांनी कॉंग्रेसचे विमान सोडून जाण्याचे मनोधैर्य केल्याचे जगजाहीर झालेले आहे.

त्यावर काहींनी त्यांना पाठींबा दिला आहे. तर, काहींनी पक्षाने कमी वयात इतके सगळे देऊन पक्षाचा विश्वासघात केल्याचे म्हटले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*