‘ट्विटर बायो’मध्ये केला ‘हा’ महत्त्वपूर्ण बदल; कॉंग्रेसशी संबंध संपला..!

कॉंग्रेस पक्षाने उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष अशी दोन्ही पद काढून घेऊन हकालपट्टी केल्यानंतर अखेर सचिन पायलट यांनी सत्य को परेशान किया जा सकता है पराजित नहीं। ही एकाच ओळ ट्विटरवर लिहिली आहे. मात्र, ‘ट्विटर बायो’मध्ये मोठा बदल केला आहे.

यापूर्वी पायलट यांच्या ‘ट्विटर बायो’मध्ये राजस्थानचे उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रातील माजी मंत्री अशी माहिती होती. आता त्यांनी राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष याचा उल्लेख काढून टाकला आहे. एकूणच आता कॉंग्रेस पार्टीशी सगळे संबंध संपुष्टात आल्याचा संदेश त्यांनी दिला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*