संशोधनातून झाले उघड : डेअरीच्या दुधामुळे महिलांना आहे ‘हा’ धोका

शहरांमध्ये बहुतांश लोक हे डेअरीचे दुध विकत घेण्याला प्राधान्य देतात. त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असला तरी डेअरीच्या दुधाचा सर्वात मोठा परिणाम स्रियांना भोगावा लागू शकतो. आंतरराष्ट्रीय जर्नल ऑफ एपिडेमिओलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार डेअरीच्या दुधाचा स्रीयांच्या शरीरावर काय परिणाम होते, हा अभ्यास करण्यासाठी संशोधकांनी ८ वर्षे अभ्यास केला आहे. डेअरीचे दूध घेतल्याने देखील महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका 80% वाढतो असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

अमेरिकेत लोमा लिंडा विद्यापीठातील गॅरी ई. फ्रेजर यांनी सांगितले की, डेअरचे दूध पिल्याने महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होतो याचे ठाम पुरावे आहेत. प्रतिदिन 1/4 ते 1/3 कप डेअरी दूधाचे सेवन ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढवू शकते. अधिक माहितीमध्ये हे आढळून आले की, प्रतिदिन एक कप दुधाचे सेवन केल्याने संबंधित धोका 50% पर्यंत वाढतो. तर प्रतिदिन दोन ते तीन कप दुध पिणाऱ्यांसाठी 70 ते 80% धोका वाढतो.  

अमेरिकेतील 53 हजार महिलांना घेऊन सदर संशोधन पूर्ण झाले. त्या महिला डेअरीच्या दुधाचे सेवन करण्यापूर्वी कर्करोगमुक्त म्हणजेच कॅन्सरमुक्त होत्या.

संशोधनाच्या शेवटी पाहिले की, एक हजार 57 महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे नवीन प्रकरणे आहेत. त्यांच्या आहार विश्लेषणामुळे सोया उत्पादने आणि ब्रेस्ट कॅन्सरचा कोणताही स्पष्ट संबंध आढळला नाही. फॅट आणि नॉनफॅट दुधाचे सेवन केल्यामुळे देखील रिझल्टमध्ये थोडी भिन्नता होती, असे मत संशोधाकांनी मांडले. या दुधाला सोया दुधाचा पर्याय चांगला आहे, असे संशोधकांनी सुचवले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*