पायलट यांना काय दिलं नाही; कॉंग्रेसने वाचला उपकारांचा पाढा

दिल्ली :

राजस्थानच्या उपमुख्यमंत्रीपदावरून सचिन पायलट यांना काढण्यात आले. त्यानंतर ‘काँग्रेस पक्षानं पायलट यांना सर्व काही दिलं. अनेक जबाबदाऱ्या व अधिकार दिले. अत्यंत कमी वयात काँग्रेसनं त्यांना राजकीय पाठबळ दिलं. वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी खासदारकी देण्यात आली. ३२ व्या वर्षी केंद्रात मंत्रिपद दिलं गेलं. ३४ व्या वर्षी  काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. ४० व्या वर्षी उपमुख्यमंत्रिपद दिलं, असे म्हणत कॉंग्रेसने त्यांच्यावर केलेल्या उपकारांचा पाढा वाचला.

पायलट यांचे भाजपकडे जाणे हे कॉंग्रेसच्या जिव्हारी लागले आहे. ‘सचिन पायलट, काही आमदार व मंत्री भाजपच्या कारस्थानाला बळी पडून काँग्रेसच्या सरकार पाडण्याच्या कटात सहभागी झाले हे अत्यंत दु:खद म्हणावे लागेल. सोनिया गांधी यांनी पायलट व अन्य मंत्र्यांशी संपर्क साधण्याचा सातत्यानं प्रयत्न केला. सहावेळा त्यांच्याशी चर्चा केली. काँग्रेस कार्यकारी समितीच्या नेत्यांनी चर्चा केली. पायलट यांच्यासाठी आमची सगळी दारे खुली आहेत, असं आवाहन खुद्द सोनिया गांधी व राहुल यांनीही केलं. काही मतभेद असतील तर चर्चा करून सोडवू असंही त्यांना सांगितलं गेलं, पण त्यांनी ऐकलं नाही,’ अशी खंत काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी व्यक्त केली.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*