पान खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यादायी फायदे; नक्कीच वाचा

पानाचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसे की मसाला पान, गोड पान, साधे पान. आजकाल नवनवीन पानही आलेले आहेत जसे की, चॉकलेट पान, मघई पान, फायर पान. आपल्यापैकी बहुतांश जन पान खाण्याचे चाहते असतील. पान हे औषधी असते हे आपणा सर्वांनाच माहिती असेल परंतु त्याचे आरोग्यासाठी नेमके फायदे काय आहेत, हे कदाचितच आपणास माहिती असेल म्हणून आज आम्ही पान खाण्याचे फायदे आपणास सांगणार आहोत.

  • पान पचन सोपे करते. लाळ ग्रंथी त्याच्या सेवनाने सक्रिय होते, ज्यामुळे लाळ बाहेर येते.
  • सर्दी कमी करण्यासाठी देखील पाने फायदेशीर ठरतात. हे फारच कमी लोकांना माहित असते.
  • पानाला मधासोबत खाल्लं तर थंडीमुळे आराम मिळतो. यात वेदनाशामक औषध आहे जे डोकेदुखी दूर करण्यासाठी उपयुक्त आहे.
  • पान भूक वाढवण्याचे काम करते. मधुमेह रुग्णांना याचा फायदा होतो. या रुग्णांनी गोड पान खाण्याऐवजी कच्चे पान खावे.
  • ज्यांना लघवी होण्यास त्रास होत आहे त्यांच्यासाठी पान खाणे रामबाण उपाय आहे.  पाने बारीक करून रस काढा आणि त्यात दुध मिसळा. आणि प्या याचा शरिराला फायदा होईल.
  • ज्यांना बद्धकोष्ठता किंवा गॅसची समस्या आहे, त्यांनी जेवणानंतर पाने खायला सुरूवात करा.
  • साधं पान खाल्ल्यास तोंडाचा वास दूर होतो.
  • जे लोक नियमितपणे सुपारीचे सेवन करतात त्यांना हिरड्यांना त्रास होत नाही.

जे तंबाखूसह पान खातात, ते पानाचे सर्व गुणधर्म नष्ट करते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*