धक्कादायक : गडचिरोली ‘एसआरपीएफ’चे ‘इतके’ जवान आढळले करोनाबाधित

गडचिरोली :

दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव सुरक्षा यंत्रणांमध्ये वाढतच आहे. नुकत्याच आठवड्याभरापूर्वी दीडशे जवानांची एक तुकडी धुळे येथून गडचिरोलीला दाखल झाली होती. त्यापैकी २९ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याने खळबळ उडाली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात केंद्रीय राखीव दलाचे ७२, राज्य राखीव दलाचे २९, सीमा सुरक्षा दलाचे २ असे मिळून १०३ जवान करोनाबाधित आढळून आले आहेत.

ज्या दिवशी लॉकडाऊन लागू झाला, त्या दिवसापासून रात्रंदिवस आपल्या जीवाची पर्वा न करता सुरक्षा कर्मचारी सेवा देत आहेत. पोलिसांसह इतर सुरक्षा यंत्रणांना करोना रोगाची लागण होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईसह महाराष्ट्रभरात पोलीस कर्मचाऱ्यांसह पोलीस अधिकाऱ्यांनासुद्धा करोनाने पछाडले आहे.  

मागील २४ तासात देशभरात २८ हजार ४९८ नवे रुग्ण आढळले असून, ५५३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. आतापर्यंत देशभरात २३ हजार ७२७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*