ब्रेकिंग : महाविकास आघाडीपुढे संकट; ‘या’ महापालिकेतील काँग्रेसचा गट राष्ट्रवादीच्या वाटेवर

सांगली :

पारनेरमधील शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर मोठे राजकीय नाट्य घडले. हे प्रकरण थंड होते न होते तोच सांगली महापालिकेतील कॉंग्रेसचा मोठा गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहे. त्यामुळे आता पुन्हा महाविकास आघाडीपुढे मोठे संकट उभा राहिले आहे.

कॉंग्रेस नेत्या जयश्री पाटील या आपल्या महापालिकेतील गटासह राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, अशी चर्चा आहे. राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासंबंधी त्यांची बैठक झाली आहे मात्र जयश्री पाटील यांनी अजूनही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही. जयश्री पाटील या राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून आणि माजी मंत्री दिवंगत मदन पाटील यांच्या पत्नी आहेत.

जयश्री पाटील या कॉंग्रेसवर गेल्या काही काळापासून नाराज आहेत. एकेकाळी गाजलेले आणि कॉंग्रेससाठी मैदान गाजवलेले माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे काँग्रेससोबत सख्य होते. आज तेच पाटील घराणे कॉंग्रेसवर नाराज आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने सांगली मतदारसंघ स्वाभिमानीसाठी सोडला, तर विधानसभेतही उमेदवारी देण्यास टाळाटाळ झाल्याने जयश्री पाटील समर्थक पक्षावर नाराज आहेत.      

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*