पायलट यांचे समर्थन केल्यामुळे महाराष्ट्रातील ‘या’ कॉंग्रेस नेत्याचे निलंबन

मुंबई :

राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचे समर्थन करणे महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेत्याला चांगलेच महागात पडले आहे. ‘ 2013 ते 2018 ही पाच वर्षे सचिन पायलट यांनी काँग्रेससाठी रक्त, अश्रू, कष्ट आणि घाम दिले. काँग्रेस 21 जागांसारख्या अत्यंत वाईट स्थितीतून 100 वर परत आली. मात्र आम्ही त्यांना नुकताच कामगिरीचा बोनस दिला. आम्ही किती गुणग्राहक आहोत. आम्ही खूप पारदर्शक आहोत.’ असे उपरोधिक ट्वीट काँग्रेस प्रवक्ते संजय झा यांनी केले होते.

पक्षविरोधी कारवाई आणि शिस्तभंग केल्याप्रकरणी संजय झा यांच्यावर काँग्रेसने कारवाई केली आहे. याप्रकरणी झा यांचे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पक्षातून निलंबन केले. संजय झा यांच्याकडे 2013 पासून काँग्रेसच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी होती. अनेक चर्चासत्रांमध्ये ते काँग्रेस पक्षाची बाजू मांडत असत. त्यांच्याकडे महाराष्ट्रातील अखिल भारतीय व्यावसायिक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*