ठाकरे सरकारचा मुनगंटीवार, तावडे आणि मुंडेना दणका; घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई :

ठाकरे सरकारने सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत असलेली महामंडळे आणि समित्यांवरील नियुक्‍त्या रद्द केल्या आहेत. ठाकरे सरकारच्या या निर्णयाचा मोठा फटका भारतीय जनता पार्टीला बसणार आहे. या महामंडळे आणि समित्यांवरील नियुक्‍त्या रद्द केल्यामुळे भारतीय जनता पार्टीचा महामंडळे, समित्यांवर असलेला दबदबा कमी होणार आहे.

सोमवारी राज्य सरकारकडून सात महामंडळे आणि समित्यांवरील राजकीय नियुक्‍त्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये राज्यस्तरीय उच्चाधिकार आणि दक्षता समितीचाही समावेश आहे. माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह माजी मंत्री विनोद तावडे, पंकजा मुंडे, राजकुमार बडोले, विष्णू सावरा आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा समावेश असलेली समितीही बरखास्त करण्यात आली आहे.

ठाकरे सरकारकडून यापूर्वी महात्मा जोतिराव फुले मागासवर्गीय महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास मंडळावरील अशासकीय नियुक्‍त्या रद्द करण्यात आल्या होत्या.मात्र, कोरोनाचे संकट अचानक उद्भवल्याने इतर महत्त्वाच्या महमंडळांबाबतचा निर्णय घेण्यात आला नव्हता.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*