केंद्र सरकारने शाळांना दिली Online classes साठी नवी नियमावली

दिल्ली :

काही शाळा मनमानी पद्धतीने Online classes घेत असल्याचे समोर आले आहे. अगदी लहान मुलेसुद्धा २-३ तास Online classes अटेंड करत आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. या सर्व बाबींमुळे पालकही टेंशनमध्ये आलेले आहेत. या पार्श्वभूमीवर पालक संघटना आणि तज्ज्ञांनी नियमावली जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शाळा आणि महाविद्यालयांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे.

अशी आहे नियमावली :-

  • Pre Primary – पालक आणि मुलांसाठी ठरवून दिलेल्या दिवशी फक्त 30 मिनिटे
  • Classes 1 to 12 – सगळ्यांसाठी NCERTने अभ्यासक्रम आखून दिला आहे. त्याप्रमाणे अभ्यासक्रम घेतला जावा.
  • Classes 1 to 8 – प्रत्येक दिवशी 30- 45 मिनिटांचे दोन सेशन्स. त्यापेक्षा जास्त नको
  • Classes 9 to 12 – प्रत्येक दिवशी 30- 45 मिनिटांचे चार सेशन्स.

या व्यतिरिक्त काही गृहपाठ देऊन इतर उपक्रम राबविण्याची शिफारसही केंद्रीय मंत्रालयाने केली आहे. सतत स्क्रिन समोर राहिल्यामुळे मुलांच्या डोळ्यांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर सतत घरी बसून राहिल्यामुळे त्यांच्या खेळण्यावरही मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे व्यायाम होत नाही. त्याचा परिणाम मुलांच्या जडण घडणीवर होऊ शकतो.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*