‘फ़क़्त निवडणूक जिंका, जनता हरलेली आहे’; वाचा रविश कुमार यांचा ब्लॉग

बिहारमधील एका मुलाचा मेसेज आला आहे, ‘पप्पांना मारलं आहे सर..’

बिहारमधील एका मुलाचा व्हाट्सएपला मेसेज आला आहे. माझ्या वयाचा विचार केला तर तो मुलगाच म्हणावं लागेल. त्यानं पाठवलेला मेसेज तुम्हीही वाचा. बिहारच्या गृह खात्याचे उपसचिव उमेश रजक यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ते हॉस्पिटलच्या समोरील फुटपाथवर पडलेल्या अवस्थेत होते. त्यांना दाखल करून घेण्यासाठी जागा मिळत नव्हती. त्यांच्या मुलाने सांगितले की, पप्पांचे निधन झाले आहे.

लेखक : रविश कुमार, पत्रकार, एनडीटीव्ही

स्वैर अनुवाद : महादेव पांडुरंग गवळी, सल्लागार संपादक, कृषीरंग

आपणही ते वाचावं. माझ्याकडं कोणतंही उत्तर नाही. पटना मेडिकल कॉलेजमधील कान, नाक, घसा विभागातील डॉ. एन. के. सिंह यांचे कोरोनामुळे निधन झाले. कोरोनयोद्धे असणारे सिंह यांच्या निधनाने मृत समाजात मात्र कोणतीही हालचाल झालेली दिसत नाही. बिहारमधील निवडणूक विजयाच्या अहंकारची धुंद सत्ताधीशांच्या डोक्यात शिरलेली आहे. त्याच धुंदीत जनताही गांजा पिऊन नाचत आहे. इतक्या दिवसांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवाज उठवत आहोत, मात्र यांच्यावर कोणताही परिणाम नाही.

मुख्यमंत्री नितीशकुमार पत्रकार परिषदही घेत नाहीत. जनता बेहाल आहे. ज्या राज्यात एकही चांगलं म्हणावं असं हॉस्पिटल नाही, एक धड कॉलेज नाही, तिथं आपण निवडणूक वगळता काय जिंकणार.? विरोधकांसाठी रोज कोणतं ना कोणतं गाणं ट्विट केलं पाहिजे. ते एकण्याजोगं नसेल तरीही करावं. तेरा कोटींची लोकसंख्या असलेलं राज्य टेस्टिंग करण्यात कितीतरी मागे आहे. उपाययोजना करण्यात अपयशी ठरत आहे. निवडणुकीत मात्र आघाडीवर आहेत.

जिंका नक्की जिंका.. जनता हरलेली आहे.. आजूबाजूला मृतदेह पसरलेले आहेत.. रस्त्यांवर रुग्ण आहेत.. तुम्ही विजयी व्हा..! तुम्हीच जिंका..!

ता.क. : या लेखातील मुद्दे व आकडेवारी ही लेखक रविश कुमार, पत्रकार, एनडीटीव्ही यांनी ब्लॉगमध्ये लिहिलेली आहे. त्यावरून हे मांडलेले आहे. त्याचा कृषीरंग संस्थेशी काहीही संबंध नाही.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*