Good News| आता करोनाच होत आहे लॉकडाऊन; होय, हे खरं आहे की..!

करोना विषाणूचा कहर कमी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने केलेल्या उपाययोजना खूपच तोकड्या पडत असल्याचे आता उघड होत आहे. असे असले तरीही भारतीयांची एकूण रोगप्रतिकार शक्ती आणि मानसिक ताकदीच्या जोरावर आपण सगळ्यांनी मिळून कोविड १९ आजाराला लॉकडाऊन करण्यात यश मिळवण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार करोनाचे रुग्ण वाढण्यापेक्षा रुग्ण बरे होण्याचा वेग खूप वाढला आहे.

करोना हा असाध्य आजार असल्यागत सगळीकडे वातावरण निर्माण करण्यात आलेले आहे. बाजारू अर्थव्यवस्था कशाचे काय करील याचाच नेम नाही. रुग्णसंख्या वाढवण्यासाठी बोगस करोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे प्रयोगशाळा अहवाल देणारे काही प्रकरणे समोर आलेली आहेत. त्यातच करोनाचे चालू आकडे देण्याची तसदी न घेता बरे झालेल्या रुग्णांचे आकडेही मिक्स करून का सांगितले जातात हाच मुद्दा अजूनही लक्षात आलेला नाही. महाराष्ट्र, भारत आणि जगभरात असेच केले जात आहे. मात्र, आता करोनाचे रुग्ण वाढत असले तरीही रुग्ण बरे होण्याचा वेग खूप मोठा असल्याची गुड न्यूज आलेली आहे.

सध्या भारतात (मंगळवार, दि. १४ जुलै २०२०) ३ लाख ११ हजार ५६५ इतके रुग्ण आहेत. तर आतापर्यंत बरे होऊन गेलेल्या रुग्णांची संख्या ५ लाख ७२ हजार ४५९ इतकी मोठी आहे. देशातील करोना रुग्णांचा सध्याचा ही आकडेवारी लक्षात घेता रिकव्हरी (आजारातून बरे होण्याचा) रेट ६२ टक्क्यापेक्षा अधिक आहे. त्यातही संपूर्ण देशाचा विचार केल्यास फ़क़्त महाराष्ट्र आणि तामिळनाडू या दोनच राज्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण सध्या आहेत.

सरकारच्या आकडेवारीनुसार असेही दिसते की, रुग्णांच्या वाढीचा दरही आता खूप कमी होऊ लागला आहे. मार्च महिन्यात हा दर ३१ टक्के होता. तर, मे महिन्यात तो ९ वरून ५ वर आला आणि तर हा रेट ३.२४ टक्के इतका कमी झालेला आहे. एकूणच आता देशभरात करोनाचे रुग्ण बरे होण्याची टक्केवारी खूप सुधारली आहे. दिवसेंदिवस त्यात चांगली सुधारणा होत आहे. असेच चित्र राहिले तर आपण सगळे मिळून या विषाणूला नक्कीच मूठमाती देऊ शकतो..!

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*