धक्कादायक| म्हणून Apple ने दिला Samsung ला ₹ 7100 कोटींचा दंड..!

तंत्रज्ञानाच्या बाजारात अॅपल आणि सॅमसंग या दोन कंपन्यांची स्पर्धा आहे. मात्र, बाजारात स्पर्धा आहे म्हणजे त्या काही फ़क़्त कुरघोडीचा डाव खेळत बसत नाही मराठी माणसासारख्या.. त्यांचे एकमेकांना सहकार्यही आहे. मात्र, सहकार्य करण्याच्या काही नियम व अटी बिजनेसमध्ये असतातच की.. त्याच अटींची पूर्तता न झाल्याने अॅपल या बलाढ्य कंपनीला सॅमसंग कंपनीस ७ हजार १०० कोटी रुपये इतका दंड द्यावा लागला आहे.

Apple कंपनी आपल्या मोबाइलसाठी लागणारे OLED डिस्प्ले Samsung कंपनीकडून घेते. वार्षिक करार त्यासाठी झालेला आहे. मात्र, आता करोना आणि काही देशांमधील आर्थिक मंदी यामुळे Apple कंपनी ठरवून दिलेले OLED डिस्प्ले त्याच क्षमतेने Samsung कडून खरेदी करू शकलेली नाही. परिणामी एकून ठरलेल्या क्षमतेच्या तुलनेत कमी OLED डिस्प्ले खरेदी केल्याचा भुर्दंड म्हणून Apple ने Samsung ला ही दंडाची रक्कम दिली आहे.

मागील वर्षीही अशाच पद्धतीने काही दंड Apple ला द्यावा लागला होता. मात्र, मागील वर्षाच्या तुलनेत यंदाची दंडाची रक्कम जास्त आहे. त्यामुळेच आता असे OLED डिस्प्ले Samsung ऐवजी इतर कोणत्याही कंपनीकडून खरेदी करणे शक्य आहे का, यावर Apple कंपनी विचार करीत असल्याचे वृत्त आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*