अंबानींनी केली मोठी घोषणा; गुगल करणार हजारो कोटींची गुंतवणूक

मुंबई :

रिलायन्स कंपनीच्या जिओ या प्लॅटफॉर्ममध्ये गुगल कंपनी ३३ हजार ७३७ कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक करणार आहे. गुगल सुमारे ७.७ टक्के हिस्सा घेणार असल्याची घोषणा कंपनीचे चेअरमन मुकेंश अंबानी यांनी केली आहे.

कंपनीच्या ४३ व्या जनरल मिटींगमध्ये अंबानींनी ही मोठी घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील ५ जी डिजिटल क्रांतीच्या दिशेने देशाने वाटचाल केली आहे. त्यासाठी आता देशाला २जी मुक्त करण्यासाठी रिलायन्स कंपनी प्रयत्न करीत आहे. त्यासाठीच गुगल ही मोठी गुंतवणूक करीत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*