मोदींची पिचईंंशी चर्चा; 2G होणार हद्दपार, ‘गुगल’ची Jio मध्ये ३४ हजार कोटी गुंतवणूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी गुगलचे CEO अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांच्याशी चर्चा केली होती. भारताला डिजिटल क्रांतीच्या दिशेने नेण्यासाठी ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे त्यावेळी पिचाई यांनी म्हटले होते. आपल्या शब्दाला जागून आता गुगलने भारताला 2G टूजीमुक्त करण्यासाठी सुमारे ३४ हजार कोटींची गुंतवणूक रिलायन्स कंपनीच्या जिओ या प्लॅटफॉर्मवर केली आहे.

कंपनीच्या ४३ व्या जनरल मिटींगमध्ये चेअरमन मुकेंश अंबानींनी ही मोठी घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील ५ जी डिजिटल क्रांतीच्या दिशेने देशाने वाटचाल केली आहे. त्यासाठी आता देशाला २जी मुक्त करण्यासाठी रिलायन्स कंपनी प्रयत्न करीत आहे. त्यासाठीच गुगल ही मोठी गुंतवणूक करीत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*