अंबानींनी आणला Jio ग्लास; पहा का आहे चष्मा एकदमच फर्स्टक्लास..!

प्रत्येक वार्षिक सर्वसाधारण बैठकीत काहीतरी नवे उत्पादन किंवा आकर्षक घोषणा करण्याची परंपरा यंदाही रिलायन्स कंपनीने जपली आहे. चेअरमन मुकेश अंबानी यांनी गुगलच्या ३४ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूक करण्याच्या घोषणेसह जिओ ग्लास नावाचे उत्पादन लॉंच केले आहे.

डिजिटल तंत्रज्ञानाचा नवा अविष्कार असलेले हे उत्पादन म्हणजे एक स्मार्ट चष्मा / गॉगल आहे. स्मार्टफोनला जोडला जाणारा हा चष्मा वास्तवात थ्रीडी इमेज दाखवणार आहे. त्याचे फिचर अफलातून असून ते वाचल्यावर हा एकदम फर्स्टक्लास असल्याचे लगेचच पटते.

हे आहेत जिओ ग्लासचे फीचर्स :

१. याचे वजन फ़क़्त ७५ ग्राम इतके कमी आहे.

२. वर्चुअल दुनियेत व्हिडिओ कॉन्फरन्स सेवा देणारे हे उत्पादन आहे.

३. यामध्ये किमान २५ वेगवेगळे अॅप्लिकेशन पाहता येतील.

४. ऑनलाईन एजुकेशन क्षेत्रात यामुळे क्रांती येईल असे कंपनीचे म्हणणे आहे.

५. घरात बसून एखाद्या ठिकाणी आपण ऑनलाईन पद्धतीने टुरिझम केल्याचा फील याद्वारे घेता येईल.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*