ग्रामपंचायतबाबत फडणविसांनी केली ‘ही’ महत्त्वपूर्ण मागणी..!

मुंबई :

महाराष्ट्र राज्यातील मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून थेट राजकीय कार्यकर्त्यांच्या नेमणुका करण्यासंदर्भात ग्रामविकास विभागाने जारी केलेला आदेश तत्काळ मागे घेण्याची मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून त्यांनी हा आदेश लोकशाही परंपरांवर आघात करणारा असल्याचे म्हटले आहे.

निवडणुका लोकशाहीचा आत्मा आहे. असा निर्णय घेतला गेल्यास संपूर्ण पंचायत राज व्यवस्थेचा कणा मोडला जाईल.पंचायती राजसंबंधीच्या 73 आणि 74 व्या घटनादुरूस्तीलाच मोडित काढण्याचा प्रयत्न होतोय, हे अतिशय दुर्दैवी आहे. मुख्यमंत्र्यांनी वेळीच यात हस्तक्षेप करावा आणि हा आदेश त्वरित मागे घ्यावा असे त्यात फडणविसांनी म्हटले आहे.

तसेच त्यांनी पत्रात म्हटले आहे की,  सुमारे 14 हजार ग्रामपंचायतींवर पालकमंत्र्यांच्या सल्लामसलतीने प्रशासक नेमण्याचे अधिकार संबंधित जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना देण्यासंबंधीचा शासन आदेश ग्रामविकास विभागाने 13 जुलै रोजी काढला आहे. हा आदेश पूर्णत: राजकीय हेतूने प्रेरित आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*