पाहिलं राफेल विमान उडवणारा पठ्ठ्या आहे महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्याचा; वाचा अधिक

मंडळी आला का न्हायी इमान? काल सगळ्यांचे स्टेटला एकच व्हिडीओ ‘बुन्गाट असणारं राफेल इमान’. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत राफेल फायटर इमान आपल्या भारतीय भूमीवर उतरल्यानंतर अवघ्या भारतीयांमध्ये उत्साह सळसळला होता.  ही विमाने भारतीय भूमीवर उतरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा एक ट्वीट केले आणि तमाम भारतीयांच्या उत्साहात मोठी भर पडली.  

बऱ्याच काळापासून या तगड्या आणि जबराट ईमानांची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत होती. या फायटर ईमानांमुळे भारतीय हवाई दलाचं बळ तुफान वाढलंय. पण तुम्हाला माहित्ये का? पाहिलं राफेल इमान उडविणारा पठ्ठ्या या महाराष्ट्राचा सुपुत्र आहे. ह्या इमान पायलट असणाऱ्या मराठवाड्यातील लातूरच्या पोरानं अवघ्या महाराष्ट्राचं नाव मोठ्ठ केलंय. लातुरातील ह्यो पठ्ठ्या उदगीरचा आहे. सौरभ अंबुरे असा त्याचं नाव असून तो एकदम मोठ्ठ्या पोस्टवर साहेब आहे मंडळी… स्क्वाडरन लीडर असणाऱ्या सौरभ यांनी राफेल विमानातून गगनभरारी घेत पहिला राफेल विमान उडविण्याचा मान मिळवला आहे.

महाराष्ट्राचं नाव या ना त्या कारणाने राजकारणात गाजत असतंच. पण राफेलच्या निमित्ताने गगनभरारी घेण्याचा मान महाराष्ट्राला मिळाला आणि त्यामुळे पुन्हा महाराष्ट्रासह देशाची पताका उंचच उंच फडकली हे नक्की.            

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*