स्वस्त झाले सॅमसंगचे ‘हे’ ६ जबरदस्त स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत

दिल्ली :

सॅमसंग या विश्वसनीय आणि आघाडीच्या मोबाईल कंपनीच्या काही स्मार्टफोनची किंमत कमी झाली आहे. चीनी मोबाईल खरेदी न करणाऱ्या ग्राहकांसाठी ही चांगली संधी आहे. हे सगळे फोन्स १६ हजारांपासून १ लाखापर्यंत किमतीचे आहेत.

१) गॅलेक्सी ए३१ (6GB + 128GB) च्या किंमतीत १ हजार रुपयांची कपात केली आहे. या फोनला आता २० हजार ९९९ रुपयांत खरेदी केले जावू शकते.

२) सॅमसंग गॅलेक्सी ए२१ एस च्या ४ जीबी प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ५०० रुपये कमी करण्यात आली आहे.

३) सॅमसंग गॅलेक्सी ए२१ एस च्या टॉप मॉडलची (6GB + 64GB) च्या किंमतीत १ हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे.

४) कंपनीने याशिवाय गॅलेक्सी A51, गॅलेक्सी A31 आणि गॅलेक्सी A21s स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे.

५) सॅमसंग गॅलेक्सी नोट १० लाइटची किंमत ४ हजार रुपयांनी स्वस्त करण्यात आली आहे. या कपातीनंतर ६ जीबी रॅम मॉडलची किंमत ३७ हजार ९९९ रुपये, आणि ८ जीबी रॅमच्या मॉडलची किंमत ४३ हजार ९९९ रुपये आहे.

६) सॅमसंगने आपल्या फोल्डेबल स्मार्टफोनची किंमत ७ हजार रुपयांनी कमी केली आहे. फोनची किंमत आधी १ लाख १५ हजार ९९९ रुपये होती. ता आता १ लाख ८ हजार ९९९ रुपये झाली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*