जगभरात ट्रेंडमध्ये असलेले चहाचे हे ५ प्रकार आणि त्याचे फायदे जाणून आश्चर्यचकित व्हाल

‘दोन चहा एक खारी, आपली मैत्री लय भारी’ असे कित्येक कोट्स आपल्याला चहाच्या दुकानात गेल्यावर वाचायला भेटतात. आजकाल मार्केटमध्ये सतराशेसाठ प्रकारचे चहा दुकाने आहेत. आजकाल कुणीही उठावं आणि उद्योजक म्हणून चहाच दुकान थाटावं, अशी परिस्थिती महाराष्ट्रात असताना आपण आज जगभरात ट्रेंडमध्ये असलेले चहाचे फायदे जाणून घेणार आहोत.

ग्रीन टी :-

ग्रीन टी मुळे मधुमेह, कॅन्सर, आणि मानसिक आजारांशी लढण्याची क्षमता मिळते. सोबतच वजन कमी करण्यास सुध्दा ग्रीन टी फायदेशीर ठरते. ग्रीनटी चे उत्पादन भारत आणि चीन ह्या दोन देशात मोठ्या प्रमाणात केले जाते.

काळा चहा (ब्लॅक टी ) :-

जेव्हा आपल्या घरी आपले डोके दुखत तेव्हा लगेच आपली आई आपल्याला म्हणते काळा चहा घे बरं वाटेल. या चहाचे निर्माण भारत, चीन, तिब्बेत, मंगोलिया या सारख्या देशात होते. सर्वात आधी या चहाच्या पानांना तोडून त्यांना उन्हात वाळवून त्यांनतर त्याची चहापत्ती बनविल्या जाते. हा चहाचा प्रकार जगभरातील लोकांना माहिती आहे.

रेड टी :-

हा नवीन चहा नसून दक्षिण आफ्रिकेमध्ये “एस्पैलाथस” नावाच्या एका झाडा पासून या चहाचे निर्माण होते, या चहाला “रूबॉस टी” नावाने सुध्दा संबोधले जाते. एवढंच नाही तर हा रेड टी ही ग्रीन टी पेक्षा अधिक प्रमाणात फायदेशीर मानली जाते. या चहामुळे आपली पाचन शक्ती मजबूत होण्यास मदत होते. सोबतच शरीरातील आजारांशी लढण्यासाठी सुध्दा ही टी फायदेमंद ठरते.

येलो टी :-

ग्रीन टी नंतर जगात सर्वात जास्त पिल्या जाणाऱ्या चहापैकी एक चहा म्हणजे येलो टी. ही येलो टी ची चव ही फळांसारखी असते, आणि या चहाला विशेष प्रकारे बनविल्या जाते. जेणेकरून चहाचा रंग पिवळा होईल.

पिंक टी :-

या चहाला मोठ्या प्रमाणात काश्मीर ची चहा म्हणून ओळखल्या जात. या चहाला पिल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. सोबतच शरीरातील कॅलरीज ला नियंत्रित ठेवण्याचे काम करते. शरीरातील हाडांना मजबूत ठेवण्यास मदत करते. 

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*