आरोग्याबाबत ‘या’ महत्वाच्या फॅक्ट्स माहीत करून घ्या; नाहीतर भोगावे लागतील दुष्परिणाम

  • अनेकदा लोकांची शिंक आल्यावर हाताने, रुमालाने तोंड दाबून धरण्याची सवय असते. या ना त्या मार्गे आपण शिंक दाबून धरण्याचा, थांबवण्याचा प्रयत्न करतो. शिंक थांबवल्यामुळे तुमच्या शरीराची रक्त धमनीही फुटू शकते.तसेच इतर समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे शिंक थांबवू नका. शिंक मोकळेपणाने होऊ द्या.
  • जेव्हा तुम्ही सकाळचा नाश्ता टाळता तेव्हा दिवसभर सुस्ती जाणवते. तसेच सकाळचा नाश्ता टाळणे हे तुमचं वजनवाढीलाही कारणीभूत ठरतं. एनीमिया, ऑस्टियोपोरोसिस, कॅल्शियमची कमतरता, केसगळती, गॅस्ट्रीक, डायबीटीस इत्यादी प्रोब्लेम्सचं कारणही असू शकतं. त्यामुळे सकाळचा नाश्ता कधीच टाळू नका.
  • रात्रीचे जागरण करणे किंवा झोपेची कमतरता ही धुम्रपानापेक्षा घातक आहे.
  • इंग्लिश स्टाईलच्या टॉयलेट सीटवर बसून शौच केल्यास पोट पूर्णतः साफ होत नाही आणि पोटातली घाण तशीच राहते. यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेसोबतच मेटाबॉलिजम कमी होणं आणि इतर आजारही होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो भारतीय पद्धतीच्या शौचालयाचा वापर केल्यास ते तुमच्या आरोग्यासाठी जास्त चांगल आहे.
  • नेहमी जेवताना प्रत्येक घास 32 वेळा चावून खावा, हे आपण लहानपणीपासून ऐकत आहोत.  बऱ्याचदा आपण ही गोष्ट चेष्टेत घेतो. आपल्या नकळत ही गोष्ट आपल्या आरोग्यावर परिणाम करत असते. अगदी आयुर्वेदात सुद्धा याचे दाखले आहेत की आपल्या तोंडात जेवढे दात आहेत, तेवढ्या वेळा आपण चावून खाल्लंच पाहिजे.
  • सरबत आणि नारळ पाणी दुपारी किंवा दुपारनंतर पिणे विषासमान आहे. या दोन्ही गोष्टी सकाळी 11 च्या आधी आपल्या पोटात जाणं हे नेहमी चांगलं.
  • कोणत्याही पेन किलरपेक्षा एक ग्लास गरम पाणी हे साधारणपणे तुमच्या 70 टक्के आजारांवर काम करतं. प्रत्येक लहानसहान गोष्टींवर औषधं आणि गोळ्या घेणं योग्य नाही. 
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*