दैंनदिन रुटीनमधील ‘या’ सवयींमुळे वाढतो मधुमेहाचा धोका

आपली बदलती आरामदायी जीवनशैली आपल्या आरोग्याला घटक ठरत आहे, असे दिसून आले आहे. फास्टफूडचे सेवन, व्यायामाची कमी आणि चुकीची जीवनशैली या सर्व गोष्टींमुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होत आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यात अशा काही सवयी आहेत ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो.

  • सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरणं गरजेचं आहे. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे तुम्हाला मधुमेह होण्याचा धोका वाढतो.
  • बैठी जीवनशैली असल्यामुळे घरी किमान ३० मिनिटे व्यायाम करा. किंवा जास्तीत जास्त शारीरिक हालचाल होईल असा प्रयत्न करा.
  • फार वेळ उपाशी राहिल्यामुळे तुमच्या इन्सुलिनच्या पातळीत बदल होतो. यासाठीच सकाळी वेळेत नाश्ता करणे गरजेचेचे आहे.
  • मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्यामुळे अन्नाची गुणवत्ता कमी होते. शिवाय प्लास्टिकच्या प्लेट किंवा भांड्याचा वापर केल्यामुळे अन्नात केमिकल्स मिसळले जातात. अशा प्रकारचे अन्न खाण्यामुळे आजकाल किशोरवयीन मुले आणि लहान बाळांमध्ये मधुमेहाचा धोका वाढत आहे.
  • आजकाल रिफांईड केलेले तांदूळ, बेकरी प्रॉडक्टस् अती प्रमाणात खाल्ले जातात. हा अती आहार घेतल्यास मधुमेह होण्याचा धोका वाढू लागतो.
  • मानसिक ताणाचा तुमच्या शरीरावर परिणाम होतो. ताणामुळे मधुमेह होण्याचा धोका अधिक वाढू शकतो. 
  • एका स्टडीमध्ये सिद्ध झाल्याप्रमाणे टीव्हीच्या समोर घालवलेला प्रत्येक तास हा तुमच्यासाठी मधुमेहाचा धोका साधारण 4 टक्क्यांनी वाढवत असतो. 
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*