रोज सकाळी पाणी प्या आणि मिळवा ‘हे’ आरोग्यादायी फायदे

आपल्या आयुष्यात पाण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. मानवी शरीरामधील अधिकांश म्हणजे ६६ टक्के भाग हा जलमय आहे. साहजिकच शरीराला सर्वाधिक गरज ज्या घटकाची असते, तो म्हणजे पाणी. वेगेवगळ्या ऋतूमध्ये माणसाच्या शरीराची पाण्याची गरज वेगवेगळी असते. उन्हाळ्यात किमान ३ लिटर पाणी प्यावे इत इतर ऋतूमध्ये दीड ते दोन लिटर पाणी पिणे गरजेचे असते. आज आम्ही आपल्याला सकाळी पाणी पिण्याचे फायदे सांगणार आहोत.

  • सकाळी पाणी पिल्यावर शरीरातील पेशींना चालना मिळते परिणामी आपले स्नायू अधिक मजबुत होण्यास मदत होते.
  • रक्तप्रवाह चांगला राहतो. त्यामुळे तुमची त्वचा चांगली राहते आणि चमकायला लागते.
  • पचनक्रिया व्यवस्थित राहते.
  • आपला स्थुलपणा कमी होण्यास मदत होते. अनेकदा वैद्य तुम्हाला वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यावर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात.
  • सकाळी उपाशीपोटी पाणी पिल्यास कफ होत नाही.
  • सकाळी पोट साफ होण्यास मदत होते.
  • सकाळी पाणी पिल्यामुळे गळा, डोळे, लघवी, किडनीच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*